
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव मागील आठ दिवसापासून सतत पडत असलेला पाऊस त्याच बरोबर दिं. ३१ ऑगस्ट च्या रात्रीला झालेल्या अति मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्या काठच्या जमिनी तील कापूस सोयाबीन पिके खरडून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. त्यामुळे महसूल कर्मचारीने तातडीने नदी नाल्या काठच्या जमिनीतील पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता त्यानंतर ही शेतातील पिके जेमतेम असतानाच तीन चार दिवसापूर्वी रात्री झालेल्या अति मुसळधार पावसामुळे नदी नाल्याकडच्या शेतातील पिके खरडून गेली आहे तर काही शेतातील पिके पिवळी पडली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे शासन प्रशासना कडून शेतकऱ्यांना मदतीची आस लागली आहे. तेव्हा महसूल विभागाच्या वतीने शेतातील स्पॉट पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
