कर्जबाजारीपणा मुळे शेतकऱ्याची आत्महत्या


राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर


मागील दोन वर्षांपासून शेतीत उत्पन्न होत नाही,निसर्ग साथ देत नाही ,सर्व खत,कीडनाशक,बियाण्याचे भाव वाढेल आहेत अश्यातच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कर्जबाजारीपणा,सतत ची नापिकी,शेतमालाला भाव कमी,आणि या वेळी कोरोणा महामारी मुळे त्रासून गजानन अजाबराव डोमकावळे वय ५४वर्षे राहणार पिंपरी दुर्ग याने १८मे २०२१रोजी विषप्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली आहे. एक हेक्टर कोरडवाहू शेती,सहकारी संस्थे चे,खाजगी सावकाराचे अंदाजे दोन लाख रुपयांच्या वर कर्ज,दोन अविवाहित मुली,एक मुलगा,पत्नी असा मोठा आप्तपरीवार गजानन च्या मागे आहे..