कोरपना तालुक्यात आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सरशी


कोरपना – तालुक्यातील २५ ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुकीत नांदा ग्राम पंचायतीत शेतकरी संघटना , भाजप , मनसे,गोंडवाना यांनी युतीतून निवडणूक लढविली . येथे युतीच्या मेघा पेंदोर या सरपंच पदी आरूढ झाल्या. थुटरा, रूपापेठ , खिरडी, परसोडा, खैरगाव, कोठोडा, बिबी येथे काँग्रेसने स्वतंत्र रीत्या निवडणूक लढवली. थुटरा येथे किशोर येडमे, रूपापेठ येथे अवंतिका आत्राम , खिरडी येथे शामराव सलाम , परसोडा येथे गिरिजा कोहाचाडे, वडगाव येथे सुनिता किंनाके , खैरगाव येथे रोशन मरापे, कोठोडा येथे रमेश मेश्राम , बिबी येथे माधुरी टेकाम ( सर्व काँग्रेस ) यांनी विजयश्री खेचून आणली. वनसडी येथे काँग्रेस राष्ट्रवादी यांनी युतीतून निवडणूक लढविली. येथे युतीच्या मंगला आत्राम विजयी झाल्या. उपरवही येथे काँग्रेस ,शेतकरी संघटना यांनी
विजय क्रांती पॅनलच्या माध्यमातून युतीतुन निवडणूक लढविली.येथे गीता सिडाम विजयी झाल्या. लखमापूर येथे काँग्रेस भाजप यांनी युतीतून निवडणूक लढविली.येथे युतीचे अरुण जुमनाके विजयी झाले. कातलाबोडी येथे शेतकरी संघटना ,भाजप यांनी युतीतून निवडणूक लढविली या ठिकाणी विजय धानोरकर यांनी विजय संपादन केला. कन्हालगाव येथे अपक्ष नवले पनल नी स्वतंत्र रित्या निवडणूक लढविली. येथे नवले पनलच्या सुरेखा नवले या सरपंच पदी निवडून आल्या. पिपरडा येथे गोंडवाना काँग्रेस यांनी युतीतून निवडणूक लढविली.येथे इंदिरा कुळमेथे विजयी झाल्या. पारडी , सोणुरली येथे शेतकरी संघटनेने स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविली. पारडी येथे निलेश येलगुडे, सोनुली येथे वासुदेव सिडाम दोन्ही शेतकरी संघटना सरपंच पदी विजयी झाले. पिपळगाव , मांगलहिरा, धानोली, चणई, दुर्गाडी, सावलहिरा येथे भाजप ची स्वतंत्ररित्या निवडणूक लढवली. पिंपळगाव येथे दीपक मडावी , मांगलहिरा येथे ज्योती राम कोहाचाडे, धानोली येथे वैशाली पेंदोर, चणई येथे रेशमा मडावी , दुर्गाडी येथे साधना कुमरे, सवालहीरा येथे उमेश जुमणाके ( सर्व भाजप )
हे सरपंच पदी निवडून आले. मांडवा येथे काँग्रेस , भाजप , शेतकरी संघटना, गोंडवाना यांनी युतीतून येथे युतीच्या राजेश्वरी जुमनके विजयी झाल्या. बेलगाव येथे गोंडवाना, काँग्रेस नी युतीतून निवडणूक लढविली येथे युतीचे विनोद जुमनाके विजयी झाले. असे असले तरी अनेक गावात सरपंच आमचाच असा दावा अनेक पक्षाकडून करण्यात येतो आहे.

माम