


सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार “महायुती सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी” आणि शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आज राळेगाव शहरात चक्काजाम (रास्ता रोको) आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, तसेच हेक्टरी ५०,००० रुपये अनुदान त्वरित जाहीर करा अशा मागण्या करण्यात आल्या.
या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित होते —
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद काकडे, तालुका प्रमुख विजय पाटील, प्रशांत वाहेकर (उपतालुका प्रमुख), वर्षाताई मोघे (महिला आघाडी तालुका प्रमुख), शंकर गायधने, डॉ. संजय पवार, सुरेंद्र भटकर, अमोल राऊत, महादेवराव मुखरे, पार्बताबाई मुखरे (महिला आघाडी शहर प्रमुख), अखिल निखाडे, सुनिल क्षिरसागर, उमेश राठोड, गणेश जामुनकर, किसना मडावी, दिपक झाडे, प्रणय मुडे, विशाल वरूडकर, वैभव लोणार, गजानन केराम, श्रीकांत कोदाणे, सुनिल सावरकर, धनराज श्रीरामे, योगेश मलोंडे, वैभव दुधे, प्रगती कावळे, मनोज वाकुलकर, देवराव नाखले, हेमंत वाभिटकर, वृषभ दरोडे, अंकुश गेडाम, आदेश आडे, रोशन उताणे तसेच असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी.
आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले. शिवसेनेच्या या चक्काजाम आंदोलनाने राळेगाव परिसरात एकच चर्चा रंगली आहे.
