
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्यातील अतिवृष्टी, पिकांचे प्रचंड नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्री दरातील तफावत यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, राळेगाव तालुक्या तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीपूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्याची मागणी राळेगाव तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात आली आहे.या संदर्भात शेतकरी संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या अध्यक्ष राजेंद्र झोटिग, यवतमाळ जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष अक्षय महाजन ,राळेगाव तालुका अध्यक्ष गिरीश तुरके प्रहार जनशक्ती पक्षाचे राळेगाव संजय गुरनुले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३० ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेने मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना राळेगाव तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देऊन राज्यातील शेतकऱ्यांवरील ओढवलेल्या संकटाची सविस्तर माहिती दिली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सलग अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली असून, उत्पादन खर्चात झालेल्या प्रचंड वाढीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यासोबतच शेतीमालाच्या भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा संघटना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल.
शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले की “शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घ्यावा आणि राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमुक्तीचे स्वप्न साकार करावे.”
ही मागणी पत्राची प्रत मा. तहसीलदार, राळेगाव यांच्याकडेही सुपूर्द करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
- राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.
- शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्तभाव देण्यात यावा तसेच शेतीमालाच्या हमीभावाच्या ग्रेटची तफावत जास्त फरकाची नसावी.
- सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हरभरा आदी पिकांच्या खरेदीसाठी केंद्रांनी तातडीने खरेदी प्रक्रिया सुरू करावी.
- अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांपर्यंतची मदत द्यावी.
- सीसीआयच्या कापूस माऊचर टक्केवारीही 8 ते 12 टक्क्यावरून वाढवून ती 20 ते 30% पर्यंत करावी.
या शेतकऱ्यांनी दिलें निवेदन
निवेदन देताना राजेंद्र झोटिंग, अक्षय महाजन, गिरीश तुरके, प्रहार चे संजय गुरनुले ,सुरेश आगलावे, भास्कर पाटील, गजानन कोल्हे, राहुल महाजन, पवन गमे , किसना उईके, रुपेश झोटिग,गजानन आवारी ,श्रीहरी राजुरकर , गिरीधर ठमके, मारुती बावणे,सौरभ महाजन,इत्यादी उपस्थित होते
