
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गाडगेबाबा जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ राळेगाव यांचे विद्यमाने राळेगाव येथे जेष्ठ नागरिकाचा आरोग्य विषयक व कायदे विषयक मेळावा ग्रामीण विकास प्रकल्प येथे घेण्यात आलेला आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून
सुरेन्द्र ताठे तर उद्गघाटक
म्हणून अमित भोईटे तहसीलदार राळेगाव उपस्थित होते.
पहिले प्रथम या मंडळाचे जेष्ठ संचालक स्वर्गवासी जगनराव तुमने यांचे दिनांक 18.8.24 रोजी निधन झाल्यामुळे त्यांना सदर कार्यक्रमात भावपूर्णश्रंदांजली 2मिनिटे स्तब्ध राहून मंडळाचे वतीने अर्पण करण्यात आली.त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे मंडळाचे वतीने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात इतने शक्ती हम देणं दाता ही प्रार्थना गीत राळेगाव येथील कुमारी रुची उर्फ गारगी राकेश राऊलकर यांनी सादर केले व सर्व मान्यवर व जेष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केलेत.
अमितजी भोईटे यांनी कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन झाल्याचे जाहीर करून ज्येष्ठांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
मोहनरावजी देशमुख वकीलसाहेब यांनी ज्येष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन केले तर श्रीकांतजी लाभसेट्वार व कुमारी निवेदिता कृष्णराव ठाकरे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय
राळेगाव यांनी ज्येष्ठांना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले..तसेच जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव गेडाम यांनी
संस्थेबद्दल संपूर्ण माहिती उपस्थितांशी सभासदांना दिली व संन संस्थेचा जमा खर्चाचा संपूर्ण
लेखाजोगा सभेमध्ये सादर करण्यात आला.
कार्यक्रमात 10 जेष्ठ नागरिकांचा मान्यवराचे हस्ते शाल,श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मंडळास नियमितपणे
योगदान करीत असल्याबाबत 7 व्यक्तीचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार
करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे संचालन निखिल राऊत यांनी केले,प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव गेडाम यांनी केले तर आभार पुरुषोत्तम ओंकार मंडळाचे उपाध्यक्ष यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता
मधुकरराव गेडाम,पुरुषोत्तम ओंकार,वाल्मीक मेश्राम,भाऊराव
ठाकरे, जानरावजी रामगडे,अशोकराव राऊत,कृष्णाजी राऊळकर,रामदासजी ससाणे,प्रभाकर चवरे,भगवंतराव धनरे,सौ.अंजलिताई महलले,
छायाताई राऊत,सौ.पुष्पाताई मडावी व गुरुदेव मानवसेवा मंडळाचे पदाधिकारी सुधीर चौधरी,शंकरराव तोडासे, विठलराव
वाघमारे, विद्याधर निशाणे व गुलाबराव चांदेकर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.शेवटी राष्ट्रगीत गाऊन
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मंडळाचे वतीने जेष्ठ नागरिकांना व मान्यवर मंडळींनी जेवणाचा आस्वाद घेण्याकरिता विनंती केली.
मधुकरराव गेडाम
अध्यक्ष गाडगेबाबा जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ राळेगाव तथा संचालक मंडळ
