
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पाऊस परतीच्या मार्गावर असताना कधी ढगाळ वातावरण, कधी गारवा तर कधी ऑक्टोबर हिटची चाहुल अशाप्रमाणे वातावरणात वारंवार बदल होत असल्याने सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा स्वरूपाचे रुग्ण पुन्हा वाढले आहेत. तापाचे रुग्ण तुलनेने कमी असले तरी खोकला व अशक्तपणा असलेले रुग्ण वाढत आहेत.
शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. घसादुखी आणि सर्दीच्या रुग्णांसह सायनस, टॉन्सिल, सततचा कोरडा खोकला अशा विकारांचेच रुग्ण सर्वाधिक दिसून येत आहेत.
दररोज शासकीय रुग्णालयात ४०० ते ५०० रुग्ण येतात तर खाजगी दवाखान्यात दररोज साधारणतः एका रुग्णालयात २५ रुग्णांची तपासणी केली जात असताना आता ती वाढून जवळ पास १०० रुग्ण देखील वाढले आहेत. लहान मुले, वृद्ध व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना याचा त्रास अधिक जावणत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश दवाखाने रुग्णांनी ओसंडून वहात असल्याचे दिसून येत आहे.
दोन आठवडे सतत कोरडा खोकला
सरकारी रुग्णालयातील लाल रंगाचे खोकल्याचे औषध घेतले तर खोकला थांबतो, असे अनेक जण म्हणतात. परंतु तरी देखील खोकला थांबत नसल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले. खूप काळ राहणाऱ्या खोकल्याने नागरिक अस्त आहेत. सर्वसामान्य परिस्थितीत औषध घेतल्यावर खोकला तीन ते पाच दिवसांत बरा होतो. मात्र, सध्या अनेकांचा खोकला दोन-तीन आठवड्यांपर्यंत राहत आहे. त्यामध्ये कोरड्या खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाने अधिक दक्षता घेऊन त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. विशेषत्ये बालके आणि ज्येष्ठांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे दिसते.
जनरल फिजिशियनच्या प्रत्येक दवाखान्यामध्ये दोन तृतीयांश रुग्ण हे सध्या सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी या आजारांनी ग्रस्त असल्याचे दिसते. त्यामुळे घराबाहेर वावरताना प्रत्येकाने स्वतःची दक्षता घ्यावी.
हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होतो. ही स्थिती सर्दी आणि खोकल्यास आमंत्रण देते. रुग्णसंख्या १० ते २० टक्के वाढली आहे. लहान मुलांना अधिक त्रास होतोय. तापमानातील बदलांमुळे अंग दुखते, आहार कमी होतो. आजारावर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्यावा. असे डॉक्टरा कडून सांगितले जात आहे.
