ढाणकी शहरात सुवर्णकारांचे आराध्य दैवत असलेले नरहरी महाराज पुण्यानुमोदना निमित्त अभिवादवन विविध कार्यक्रम


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी


ढाणकी,दिनांक १५ शनिवार रोजी
सुवर्णकार बांधवांचे आराध्य दैवत
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यानुमोदना निमित्त सर्व सुवर्णकार बांधवानी मोठ्या आदराने नरहरी महाराज यांना अभिवादन केले. ढाणकी शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. शहरातील सर्व सुवर्णकार बांधव ,प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग ,लहान चिमुकले व महिलांचा मोठा सहभाग शोभायात्रेत दिसून आला. टाळ मृदंगाच्या गजराने ढाणकी नगरी दुमदुमून गेली होती. शहरातील भजनी मंडळांनी या शोभा यात्रेत विशेष सहभाग घेऊन शोभा यात्रेत अधिकच सुबकता वाढवली.टाळ- मृदंगाचा गजर, रिक्षांवर विविधरंगी फुले आणि लाईटच्या माळांची सजावट, रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून शेकडो शहरवासीयांच्या उपस्थितीत संपूर्ण शहरातून संतश्रेष्ठ नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचा फोटो लावून अतिशय शांतपणे शोभायात्रा काढली गेली. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन सुद्धा केले होते.