
सहसंपादक: रामभाऊ भोयर
् श्रीमती कौसल्या किसनराव वक्ते पाटील यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण करून 101 वर्षात पदार्पण केले या निमित्ताने 24 डिसेंबर 2023 रोजी आजीचा शतपूर्ती सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमास यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा. भावनाताई गवळी , आदिवासी विकास महामंडळाच्या संचालिका मिनाक्षीताई वेट्टी, वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा ठाकरे ,श्री संजयजी वानखेडे कार्यकारी अभियंता नागपूर हे प्रामुख्याने उपस्तीत होते. श्रीमती कौसल्या किसनराव वक्ते पाटील ह्या सौ कविता बोरुळकर ( भाजपा) यांच्या मातोश्री व तसेच देविदास बोरुळकर (से नी) ग्रामसेवक यांच्या सासूबाई आहेत. या कार्यक्रमास अनेक ठिकाणांहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले नातेवाईक उपस्थित होते.हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
