
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली येथील विनोद बाबारावजी अलबनकार वय वर्ष 37 यांनी आज रोजी सकाळी साडेआठच्या सुमारात आपल्या घरी फाशी घेतआपले जीवन संघर्ष संपविला त्यांचे मोठे बंधू हे आपल्या शेतातून येत असताना घराजवळ गाडी उभी दिसल्याने त्याने चौकशी केली असता फाशी घेवून असल्याचे निदर्शनास आले,गळफास घेण्याचे कारण असे जनसामान्यातून दिसून येते की सतत होत असलेली नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आपल्या आयुष्य संपले असे चर्चा सुरू आहे त्याच्या मागे आई-वडील, मोठा भाऊ ,बहीण,पत्नी,दोन मुले असा बराच आप्त परिवार असल्याने व तालुक्यात त्यांचा मित्रपरिवार खूप मोठ्या प्रमाणात आहे , त्यामुळे सर्व तालुक्यात दुःखाचे सावट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे त्यांचे दोन्ही मुलं अतिशय लहान असून विनोद हा एक पत्रकार होता त्यामुळे तालुक्यातील सर्व समाजातील लोकांसोबत त्यांचे आपुलकीचे संबंध होते त्यांच्या या मृत्युने राळेगाव तालुक्यातील जनतेत शोककळा पसरली आहे.
