
सहसंपादक: रामभाऊ भोयर
एकाच आठवड्यात दोन आगीच्या घटना राळेगाव शहरात घडल्या आज (दि. 21) पहाटे 1 वा. च्या सुमारास चार दुकानांना आग लागली. लाखोचा ऐवज जळून खाक झाला. त्या आधी ठोंबरे यांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत जनावरंचा होरपळून मृत्यू झाला होता. या अग्नीतांडवाने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दोन्ही दुर्देवी घटनेत आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही.
पहाटे लागलेल्या या भिषण आगीत पाच दुकाने खाक झाली दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .१)डॉ मुजुमदार यांचे फर्निचर दूकान, २)विनोद चुनारकर इलेक्ट्रीकलस ३),किशोर येलोरे झाडगाव कापड दुकान ४) जगदीश येबरे यांचे कापड दुकान,या चारही दुकानाला भिषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आग लागलेल्या घटनेची माहीती मिळताच राळेगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली .उपविभागीय अधिकारी राळेगाव,तहसीलदार राळेगाव यांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचुन राळेगाव नगर पंचायतींच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.अग्निशमन दलाने व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या शर्थिच्या प्रयत्नाने आग विझविण्यासाठीशर्थिचे प्रयत्न करण्यात आले पण आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने आग विझविणे कठीण दिसत होते त्यामुळे पुन्हा यवतमाळ येथील दोन,घाटांजी येथील १,व कळंब येथील १अग्निशमन दलाला पाचारण केले पाचही अग्निशमन दल हे घटनास्थळी तातडीने पोहचुन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग विझविने नियंत्रणात आले या आगीत पाच दुकान जळुन खाक झाल्याने लाखोचेनुकसान झाले आहे.
