
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विविध घटनांमधून बारकाईने तपास करून अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याने राळेगांव पोलीस ठाणे हे गुन्हे शोध तपासणीत क्राईम मध्ये पार पडलेल्या सभेत जिल्ह्यातील राळेगांव पोलीस ठाणे सर्वोत्कृष्ट ठरले असून प्रथम पारितोषिक साठी निवड करण्यात आली आहे त्यामुळे राळेगांव पोलिस ठाण्याची मान उंचावली आहे.
राळेगांव शहरात महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये चोरी केलेल्या चोरट्यांचा छडा लावून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला, तसेच अनेक प्रकारच्या गुन्ह्याचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणले. त्याबद्दल राळेगांव पोलीस ठाण्याला गुन्हे तपास शोध कामगिरी बद्दल सर्वोत्कृष्ट ठाणे ठरले असून राळेगांव पी एसआय दीपक राणे, एचसी ३९७ गोपाल वास्टर, एच सी १४८४ रत्नपाल मोहाडे, एनपीसी ११०९ सुरज चिव्हाने एनपीसी २३४६ विशाल कोवे यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले या गौरवास्पद कामगिरीबद्दल राळेगांव पोलीस ठाण्याला शाबासकीची थाप मिळाली आहे.
