
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे रहदारीचा रस्ता मोकळा करण्यासाठी रावेरी येथील किसना मारोती खेकारे हे उपोषणास बसले होते . त्या उपोषणकर्ते यांची म्हणणे लक्षात घेऊन रावेरी ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायत मधील ज्यांनी रहदारीचा रस्ता अडविला होता.त्यांचे सदर जागेबाबतील सगळे आठ अ, व पुरावे यांची शाहानिशा करुन सदर रहदारीचा रस्ता अडविणार्या इसमाला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून सरपंच, उपसरपंच, सचिव, विस्तार अधिकारी पंचायत विभाग पंचायत समिती राळेगाव ,ग्रा.पं. सदस्य , तसेच राळेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकर, यांच्या समक्ष अतिक्रमण केलेल्या इसमाला ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच,सचिव , विस्तार अधिकारी,व सदस्य यांनी तुम्ही अतिक्रमण केले आहे आमच्या ग्रामपंचायतकडे त्या जागे संदर्भात कुठलाही आठ अ कींवा कुठलेही नोंद नाही तरीपण तुमच्या कडे काही जागे संदर्भात पुरावा असेल तर आम्हाला द्या नाहीतर अतिक्रमण करुन रस्ता मोकळा करुन द्यावा.तुम्ही रहदारीचा रस्ता अडविल्यामुळे उपोषणकर्ते उपोषणाला बसले आहे. तूम्ही तुमचे अतिक्रमण काढुन घ्यावे अशी विनंती पण केली पण अतिक्रमणकर्त्याने अतिक्रमण काढले नसल्याने शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाने, पोलिस बंदोबस्तात सदर रहदारीच्या रस्त्यावर अडविल्या ठिकाणी जाऊन केलेले अतिक्रमण काढले.व उपोषणकर्ते यांच्या मंडपात येऊन सदर अडविलेला रस्ता मोकळा केला असल्याने उपोषणकर्ते यांची मागणी पूर्ण करुन उपोषण रावेरी येथील सरपंच राजेंद्र तेलंगे यांनी निंबुपाणी पाजुन सोडण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सचिव कुरटकर, ग्रा.पं उपसरपंच गजानन झोटींग, विनोद काकडे, हनुमंत डाखोरे,श्याम शेळके, पोपळकर विस्तार अधिकारी पंचायत विभाग पंचायत समिती राळेगाव,नितीन हीवरकर, तंटामुक्त अध्यक्ष, ग्राम पंचायत कर्मचारी गणेश भडे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
