
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
प्रोत्साहन पर अनुदानासाठी दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर केवायसी केली परंतु २० ते २५ दिवस होऊ नये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही अनुदान जमा झाले नाही त्यामुळे नियमित कर्ज भरणारे दुसऱ्या यादीतील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
महाराष्टात ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबविण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात जून महिना सत्तांतर झाल्यानंतर प्रोत्साहन अनुदान रखडले होते .मात्र त्यानंतर शिंदे सरकारने प्रोत्साहन अनुदान देण्याचा तत्कालीन सरकारचा निर्णय कायम ठेवला होता तसेच दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची खाती बँकांकडून अपलोड केली होती व प्रोत्साहन अनुदानाची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही लोकांना अनुदानाची रक्कम प्राप्त झाली तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही अनुदान जमा झाले नाही त्यानंतर पहिल्या यादीतील लोक अनुदानाच्या प्रतीक्षेत त्यांना दुसरी यादी प्रसिद्ध झाली मात्र दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही अनुदान जमा न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सेतू थम मशीनवर अंगठा देऊन केवायसी केली परंतु पण २० ते २५ दिवस उलटून गेल्यानंतरही खात्यामध्ये अनुदान अद्यापही जमा झालेले नाही
शेतकरी उसनवारी करून ३१ मार्च च्या पूर्वी कर्ज खाते नियमित ठेवतो पहिल्या यादीमध्ये नाव न आल्याने दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागली नंतर दुसऱ्या यादीमध्ये नाव आले परंतु केवायसी केल्यानंतर आता अनुदानाची प्रतीक्षा करीत आहोत लवकर खात्यावर अनुदान जमा करावे
शेतकरी कर्ज खाते नियमित भरण्याकरिता घरातील सर्व शेतीमालबकवडीमोल भावात विकून ३१ मार्च च्या पूर्वी कर्ज खाते नियमित ठेवतो केवायसी केल्यानंतर आता अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे
प्रोत्साहन अनुदान देण्यात शासना कडून वेळ होत आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिय तालुक्यातील प्रोत्साहन अनुदान यादीत असलेल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखविल्या आहेत.
