रिधोरा ग्रा प मध्ये विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल विधवा महिला आशा निळगुडवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे 26 जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. सदर हा सत्कार ग्रामपंचायत सचिव विना राऊत तथा अंगणवाडी सेविका सौ मीराबाई करपते यांच्या हस्ते करण्यात आला आहे. सदर गावचे प्रथम नागरिक कर्तव्यदक्ष उमेश भाऊ गौऊळकार सरपंच यांनी जेव्हापासून सरपंच पदाची धुरा सांभाळली तेव्हापासून आपला झेंडा वंदनाचा मान हा गावातील पोलीस पाटील, माजी सैनिक, आशा वर्कर व विधवा महिलेला देण्यात आला आहे सदर हा मान
नेहमीच समाजात गावात देशात या कुटुंबात चांगली कामगिरी करणाऱ्यांना हा मान रिधोरा या गावाचे सरपंच उमेश भाऊ गौळकर यांचा संकलपेतून देण्यात येतो सदर या कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष, मंडळी तंटा मुक्त अध्यक्ष ,तलाठी पोलीस पाटील, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गुरुदेव सेवा मंडळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सर्वोदय विद्यालय , महिला बचत गट,सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थिती होते.