नागरी ते जामखुला रस्त्यावर अपघात झाल्यास कुटुंबियांना नोकरी व आर्थिक मदत द्या किंवा रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा भीक मांगो आंदोलन ,अभिजित प्रभाकरराव कुडे यांचा इशारा


वरोरा: तालुक्यातील नागरी ते जामखूला रस्त्याची दुरवस्था झाली आहे, रस्त्याने साधी मोटारसायकल वरून प्रवास करणे कठीण झाले आहे. लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे, तरी या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे नागरी ते जामखुला रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साहशिक खेळाचा दर्जा द्या, अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी व कुटुंबाला १० लाख आर्थिक मदत द्या असे निवेदन तहसीलदार मॅडम वरोरा मुख्य बांधकाम अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास भिक मांगो आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावेळी नई सोच युवा शक्ती सामाजिक संघटना सचिव शुभम हीवरकर, अनिकेत राऊत, तेजस उरकुडे उपस्थित होते