
वणी :- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरकारने प्रति हेक्टर १३,६०० रुपये मदत जाहीर केली होती. ती मदत मागील एक महिन्यापासून प्रलंबित पडली होती ती अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात काल ता.१९ पासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
सातत्याने होत असलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यात तीनदा अतिवृष्टी झाली व शेतकऱ्यांचे अथोनाथ नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत प्रति हेक्ट १३ हजार सहाशे रुपये मदत घोषित केली होती व त्या मदतीचा निधी ही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाला व जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसील कार्यालयाला वितरित करण्यात आला होता परंतु हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता त्यासाठी महसूल विभागाच्या तलाठी, कृषी विभागाचे कृषी सेवक, व ग्राम पंचायतीचे ग्राम सेवक यांना सम प्रमाणात गाव वाटप करण्यात आले होते. यातील तलाठी व कृषी सेवकांनी शेतकऱ्यांना मदत पोहचली पाहिजे या करिता जबाबदारी स्वीकारली परंतु ग्राम सेवकांनी मात्र ती आमची जबाबदारी नाही म्हणून वितरण करायला नकार दिला होता. त्यामुळे एक नवीन पेच तयार झाला होता. जेवढी गावे ग्रामसेवकांच्या वाट्याला गेली होती तेवढी सर्व गावे तालाठयांनी आपल्या घेतली व ती सर्व गावे आम्हीच करणार म्हणून कामाची हमी दिली व कृषी सेवक , तलाठी यांनी शेतकऱ्यांना निधी वाटप करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काही का होईना पण गोड होणार आहे. या कामाकरिता तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार विवेक पांडे, रामचंद्र खिरेकर, रवींद्र कापशिकर , सर्व मंडळ अधिकारी, तलाठी तसेच तालुका कृषी अधिकारी माने, सर्व कृषी सेवक आदी परिश्रम घेत आहे.
ग्रामसेवकांच्या अडेलतट्टूपणा विलंबनास ठरला कारणीभूत ?
शेतकर्यांना अतिवृष्टीचा निधी वाटप करण्यात ग्रामसेवकांनी अडेलतट्टू धोरण वापरल्याने वितरणात विलंब झाला होता सरकारच्या आदेशननंतही ग्रामसेवक अडेलतट्टू धोरण राबवित होते त्यामुळे निधीचे वितरण प्रलंबित पडले होते. शेवटी तलाठयांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव करून निधी वितरणाच्या कामाला गती दिली आहे. तर गटविकास अधिकारी गज्जलवार यांनी काही मोजक्या ग्रामसेवकाना शेतकऱयांच्या अडचणीची जाणीव करून त्यांना कामाला लावले आहे. परंतु सर्वच ग्रामसेवकांनी या कामात मदत केली असती तर मदत अगोदरच शेतकऱयांच्या खात्यात जमा झाली असती. ग्रामसेवकांनी अडेलतट्टू धोरण राबविले नसते तर मदत लवकर शेतकऱ्यांच्या पदरात पडली असती.
एकाच दिवसात ११ हजार शेतकऱ्यांना मदत वाटप
वणी तालुक्यासाठी येऊन ३१ हजार १०६ शेतकरी असून त्यांना मदतीकरीता ७५ करोडो रुपये निधी प्राप्त झाला आहे. एकाच दिवसात यातील २७ करोडो रुपये ११ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित निधी वाटपाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ज्या मदतीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती ती आता संपुष्टात आली आहे. काही का होईना पण शेतकऱ्यांच्या मनात थोडाफार आनंद दिसून येत आहे.
वंचितच्या जनआक्रोश महामोर्चाची प्रशासनाकडून दखल
नुकताच विविध मागण्याकरिता श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी, शेतमजुरांनी तहसील कार्यालयावर विविध मागण्याकरिता जन आक्रोश मोर्चा काढून यात शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली होती यावरून प्रशासनाच्या कामात गती आली व शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरवात झाली आहे असे मत वंचितचे जिल्हा महासचिव मिलिंद पाटील जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग ,शहराध्यक्ष किशोर मुन यांनी न्युज टुडे शी बोलताना व्यक्त केले आहे. मदत मिळायला लागल्याने शेतकऱ्यांकडून श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीचे आभार मानल्या जात आहे.
