
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव सारख्या शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या तालुक्यातुन तो येतो. सर्वसाधारण पण अंत्यत प्रामाणिक कुटुंबातुन तो पुढे आला.प्राथमिक शिक्षण राळेगाव येथे माध्यमिक व उच्च शिक्षण नाशिक येथे. अंगभूत विद्वत्तेला परिश्रमांची जोड दिली आणि अत्यंत कमी वयात युवा उद्योजक म्हणून त्याने लौकिक मिळवला. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात तो अनेकांचा आयडॉल ठरलाछ आहे. हृषीकेश मेंडोले हे त्याचे नाव. हृषीकेशच्या कर्तृत्वाला साजेसा समंध देखील जुळून आला हा एक आणखी दुग्धशर्करा योग.कर्तव्यनिष्ठ माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांची धाकटी मुलगी डॉ. ओमा सोबत हृषीकेशचा विवाह नुकताच संपन्न झाला. या निमित्त महेश झगडे यांनी खर्चातील शिल्लक रकम मुख्यमंत्री सहायत्तानिधीला देण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा असणाऱ्या मेंडोले व झगडे कुटुंबियांच्या या निर्णयाने सामाजिक भान व संवेदनशीलतेचा प्रत्यय दिल्याची प्रतिक्रिया तालुक्यात व्यक्त होते आहे. धनाची व मनाची श्रीमंती लाभलेल्या या कुटुंबियांच्या ऋणानुबंधावर तालुक्यातुन अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत -करत युवा उद्योजक या वर्गात हृषीकेशने आपले स्थान भक्कम केले . विशेष म्हणजे शिक्षणाबाबत उदासीनता असणाऱ्या, शैक्षणिक सोई -सुविधा नसणाऱ्या राळेगाव सारख्या शहरातून जाऊन त्याने घेतलेली ही झेप अनेकांकरीता प्रेरणादायी ठरली आहे. राळेगाव येथे आल्यावर कोणताही बडेजावं न करता तो सर्वांमध्ये मिसळतो. सांस्कृतीक, धार्मिक, प्रबोधनात्मक कार्यात सहभागी होतो. रक्तदान शिबिरात रक्तदान करतो. युवकांना पुढील दिशा व भविष्यातील संधी यावर मार्गदर्शन देखील करतो. आई -वडील, बहीण, जावई, काका -काकू व सर्व परिवाराच्या पाठिंब्याचा आवर्जून उल्लेख करतो. अशा युवकाची महेश झगडे सारख्या सुप्रसिद्ध माजी सनदी अधिकारी यांनी निवड केली. त्यांनी मोठ्या मुलीचे लग्न देखील अंत्यत साधेपणाने केले होते. तो पायंडा त्यांनी कायम ठेवला. विशेष म्हणजे त्यांना दोन्ही मुलीच आहेत.
काहीच नसतांना उगीच कर्जबाजारीपणा ओढवून बडेजावं करणार्यांची कमी आपल्याकडे नाही. त्यातून आर्थिक घडी विस्कटते विपन्नावस्था येते. असा अनुभव असतांना सर्वकाही असतांना काटकसर करून विवाह करायचा शिल्लक रक्कम सर्वसामान्य जनतेच्या कामी येईल असे नियोजन करायचे याला सामाजिक भान लागते. ती दृष्टी असणार्या मंडळीनी समाजाला प्रत्यक्ष कृतीतुन एक दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तुज आहे तुज पाशी परी जागा भुललाशी ‘ च्या आशयानुरूप या ‘जागा ‘ अशा ‘व्यक्ती ‘ यांचा आदर्श घेण्याची नितांत गरज आहे.
