किनवट तालुक्यातिल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पैसे घेवुन नियुक्त्या देण्यात आल्या होत्या?

किनवट तालुक्यातील काही गावातील ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या असून काही गावात जनतेने नवीन
उमेदवाराणा संधी दिली आहेतर काही गावात जुन्या उमेदवार यांना जनतेची पसंदी लाभली आहेज्यामुळे बर्‍याच ठिकाणी ग्रामसेवक यांना बदलण्याची
मांगणी जोर धरत असल्याने आरोप प्रत्यारोपामध्ये आता थेट गट विकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांचा नावाचा समावेश होत असल्याचे ऐकावयास मिळत आहे

2017-2018 मध्ये
किनवट तालुक्यातील सुमारे 134 ग्रामपंचायत मधील विकास कामा सोबत रिक्त पदे भरण्या करिता शासकीय नियमांना दुजोरा देवून ग्रामसेवक,विस्तार अधिकारी आनि गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयीन कर्मचारी यांच्या नियुक्त्या केल्याचे आरोप किनवट तालुक्यातील जनतेतून ग्रामसेवक यांच्या सह पंचायत समिती किनवट येथील वरिष्ठ अधीकारी यांच्या वरती केले जात आहे
.

2017-2018 मध्ये पंचायत समिती किनवट येथुन काही ग्रामपंचायत मधील लिपिक, कारकून, सेवक, पाणी पुरवठा कर्माचारि या सारखे रिक्त पदे शासकीय नियमा नुसार का भरण्यात आली नाही याची रीत सर चौकशी करण्यात यावी अशी माँगनी जनतेतून केली जात आहे