
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील सातव्या सत्राचे कृषी विद्यार्थविद्यार्थी यश घडले, दर्शन दिवडे, संदेश धानोरकर, प्रज्वल तोड़ासे यांनी कृषी कार्यानुभव या कार्यक्रमाअंतर्गत बरडगांव येथील शेतकरी मित्रांसाठी लसीकरण शिबीर आयोजित केले.
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 राळेगाव यांचा लसीकरण शिबिरात कृषी विज्ञान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग व जनजागृती मोहीम राबविली या साठी डॉ. आर. नाळे (पशुवैद्यकीय अधीकारी) यांनी लसीकरण बाबत मार्गदर्शन केले आणि लंपी रोगा बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली व त्यांचे सहकारी मनीष खेळकर, थॉमस पेंदाम, गजू डोडेवार, नयन कोकाटे रुपेश मेश्राम, समीर जुमनाके, मयूर जीवतोडे, प्रणित उईके यांनी सहकार्य केले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्हि कडु, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. महानुर, विषयतज्ञ. प्रा. एस. पी. लोखंडे या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या साठी गावाचे उपसरपंच बळवंत पाझारे, ग्रामसेवक वृषाली पिंगळे मॅडम, पोलीस पाटील प्रकूल पाटील, व उपस्थित शेतकरी रविन्द्र पाझारे, विठ्ठल गंडे, रामचंद्र शिवनकर, साहील पुडके, राहुल गंडे, रूपेश म्हैसकर , संदीप सोनारखंड, राहुल पाटील, दिलीप मेलेकर व ईतर शेतकयाची उपस्थिती दाखवुन सहकार्य केले.
