संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे शालेय स्नेहसंमेलन संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे दरवर्षीप्रमाणे वार्षिक शालेय स्नेहसंमेलन -सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते.शालेय क्रीडास्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचे छोटे खेळ, कब्बड्डी स्पर्धा, धावण्याची स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्याने विद्यार्थिनींच्या रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पाककलेचा व खरी कमाईचा अनुभव यावा म्हणून ‘आनंदमेळावा ‘ आयोजित करण्यात आला.
शालेय स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रम उदघाटन समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दिनकर उघडे तर उदघाटक म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मिनाक्षी येसेकर, प्रमुख उपस्थिती सिमा देशमुख, देवेंद्र मून उपस्थित होते. मान्यवरांनी प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध एकल नृत्ये, समूह नृत्ये,नाटिका सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन राकेश नक्षिणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश मिटकर, सलमा कुरेशी, ज्ञानेश्वरी आत्राम, भाग्यश्री काळे, विलास ठाकरे, अनंता परचाके, प्रकाश अंबादे यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.