
श्री संत गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट वणी यांचे वतीने श्री गजानन महाराज मंदीर, गुरुवर्य कॉलनी यवतमाळ रोड, वणी येथे दि. १२ व १३ फेब्रुवारी २०२३ ला श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी परिसरातील सर्व भावीक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा
रविवार दि. १२ फेब्रुवारी ला सांय. ७ वाजता संगीतमय प्रवचन व गीत गजानन कार्यक्रम, सादरकर्ते :- ह.भ.प. मनु महाराज तुगनायत आणि संच, दुपारी १२ ते ३ भजन, सादरकर्ते: जैताई माता भजन मंडळ वणी,दुपारी ३ ते ५ भजन, सादरकर्ते : श्रीपाद भजन मंडळ, वणी, सोमवार १३ फेब्रुवारी ला सकाळी ७ वाजता अभिषेक व पुजा, सकाळी ९ वाजता पालखी मिरवणुक (जि.प.कॉलनी व गुरुवर्य कॉलनी) परिसरात, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद वाटप व सायं. ७ वाजता भक्ती संगीत व सुगम गायनाचा सुश्राव्य कार्यक्रम, सौजन्य : स्व. गुलाबराव खूसपुरे यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री राजेश खूसपुरे व परिवार वणी,
सादरकर्ते :- श्री राम पवार सर आणि संच वणी,
वरील सर्व कार्यक्रमास अधिकाअधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
