
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संघटन विस्तारासाठी सातत्याने कार्यरत असून, या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यात महत्वाची नेमणूक जाहीर करण्यात आली. श्री. नारायण माणिकरावजी चव्हाण, रा.पिंपळसेंडा कळंब तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर लक्ष्मणराव इंगळे यांच्या स्वाक्षरीयुक्त नियुक्तीपत्राद्वारे प्रदान करण्यात आली. पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचविण्याचे उद्दिष्ट लक्षात घेता ही नेमणूक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
जिल्हाप्रमुख इंगळे यांनी पत्रात म्हटले आहे की,
“आपण आपल्या कार्यात निष्ठा, शिस्त आणि समर्पण जपत आपल्या क्षेत्रात शिवसेना संघटना अधिक शक्तिशाली व मजबुत करण्यासाठी पुढाकार घेऊन काम कराल, अशी अपेक्षा आहे. आपल्या मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास सदिच्छा!”नवीन नेमणुकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कळंब तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
