ढाणकी शहरात एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


दिनांक २९ जून गुरुवार रोजी झालेल्या एकादशीचा सोहळा ढाणकी शहरात मोठ्या उत्साहात पार पडला शहराचे दैवत श्री हनुमान मंदिरामधून वारकऱ्यांनी मुख्य मार्गाने शहर प्रदक्षिणा घालून हरिपाठ म्हणून व अनेक अभंग भजने म्हणून नंतर भक्ती युक्त भावफेरीची सांगता करण्यात आली तसेच ढाणकी शहरातील असंख्य भाविक भक्तांचे व नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सुद्धा यथोचित पूजा करून नंतर सर्वच आलेल्या भाविक भक्तांना फराळाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली होती संपूर्ण विठुरायाचे मंदिर विशिष्ट अशा लाइटिंग ने सजवण्यात आले होते मंजुळा आणि फुलांनी सावळ्या विठ्ठलाची मूर्ती चित्ताची एकाग्रता स्थिर करणारीच होती शिवाय चंदनाच्या लेपामुळे मूर्तीच्या सौंदर्यात अधिकची भर पडली होती हे मंदिर जुने होते अनेक भाग निकामी होत असताना अनेक सदभक्तांनी येऊन साफसफाई करून परिसर स्वच्छ केला होता