
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दररोज लागणाऱ्या पिण्याच्या विहिरी सभोवताल अतिक्रमण केल्याने गावातील महिलांना टवाळखोरांच्या यातना यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे विहीरी भोवती असलेले अतिक्रमण काल दिनांक ११ ऑक्टोंबर २०२३ तत्काळ काढुन विहीर मोकळी करून दिली त्यामुळे नारी शक्ती पुन्हा एकवटल्याचे दिसुन आले. आज मौजा आंजी येथील ग्रामपंचायत ५ सार्वजनिक विहिरी भोवतालील अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण अतिक्रमण करुन व ग्रामपंचायत च्या मोकळ्या जागेवरील गुराचे गोठे, खाताचे ढिगारे टाकून अतिक्रमण केले होते सदर अतिक्रमण बाबत
पानटपरी, किराणा दुकान टाकून अतिक्रमण केलेल्यांची गावाकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार करण्यात आली होती सदर अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायत ने रीतसर वारंवार नोटीस देऊन सुद्धा अतिक्रमण काढण्यात आलेले नव्हते त्यामुळे नाईलाजास्तव ग्रामपंचायतनी पोलीस बंदोबस्त घेऊन सदरील जागेवरील अतिक्रमण आज रोजी ग्रामपंचायत आंजी सरपंच सौ ताराबाई सोयाम उपसरपंच प्रफुल पवार,सदस्य निलेश पिंपरे, सुरेश चौधरी, सदस्या सारिका चौधरी, सिमा चांदेकर व ललिता राऊत विस्तार अधिकारी पंचायत समिती राळेगाव सुर्वे साहेब ग्रामपंचायत सचिव सचिव मुजमुले पोलीस स्टेशनं चे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड साहेब व इतर पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यात येऊन साहित्य जप्त करण्यात आले.
