
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी.
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे अनिवार्य बनले असल्याकारणाने ग्राहकांची सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी बँकेत दिसते. येथील व्यवहार व रक्कम हे सुरक्षित असल्याकारणाने ग्राहकांचा ओढा इकडे राहते. व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकाची यातून मुक्तता व्हावी आणि व्यवहार जलद होऊन ग्राहकाची तारांबळ थांबावी या करिता एटीएमचा उपयोग होत असताना सगळीकडेच बघायला मिळते. मात्र ढाणकी शहरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम सुविधा ही बाहेर इतरत्र नसून ज्या ठिकाणी शाखेचे नियमित व्यवहार चालतात अशाच ठिकाणी ही सुविधा बँकेने उपलब्ध करून दिल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच शाखा प्रबंधक लांबलचक सुट्टीवर गेल्याचही कळलं त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पायपोस कोणाच्या पायात दिसला नाही हे विशेष. सर्वसामान्यांच्या कष्टाच्या रकमेवर यंत्रणा चालते मग हे पद पगारासाठी निर्गमित केले??
गर्दीचे ठिकाण हे चोरट्याचे पहिले लक्ष बनून चोरीच्या घटनांना वाव मिळतो. काही दिवसांपूर्वीच स्टेट बँक शाखा ढाणकी येथे ग्राहकाचा खिसा कापून रक्कम लंपास केल्या गेली व मोठ्या प्रमाणात ग्राहकाला आर्थिक फटका बसला. जर एटीएम मशीन व पासबुक प्रिंट करण्याची मशीन बाहेर असती तर अनेक ग्राहकांनी एटीएम या रक्कम काढण्याच्या सुलभ पद्धतीचा वापर करून आपला व्यवहार पूर्ण केला असता व ग्राहक आपला व्यवहार पूर्ण करून तत्काळ निघून जात होते आणि गर्दी होत नव्हती.पण प्रत्येकच ग्राहकांना आपली काम करताना अनेक अडथळे येत असल्याने गर्दी नियमितच राहत आहे त्याचा फायदा चोरटे घेत असतात.एटीएम ची सुविधा ही बँकेने ग्राहकाच्या सेवेकरिता सुरू केली आहे. एटीएमचा संपूर्ण प्रभार सर्वच प्रमुख बँका आऊटसोर्सिंग यंत्रणे द्वारेच चालवीतात. केवळ रक्कम भरण्यापुरताच बँकेचा एटीएमसी संबंध येतो व इतर देखभाल सुविधा घेणाऱ्या एजन्सी कडेच असते मग स्टेट बँक शाखा ढाणकी अशा पद्धतीची यंत्रणा राबवून सर्वसामान्यांनाची होणारी तारांबळ का थांबत नाही. किंवा काही तांत्रिक अडचण असल्यास ती विभागीय स्तरावर सोडवायला पाहिजे. राजकीय पक्षांनी काही दिवसांपूर्वी याबाबत निवेदनही दिले होते पण बँक प्रशासन मात्र निगरगट्ट बनले. वास्तवात स्टेट बँक सर्वच ग्राहकांना खाते काढताना एटीएम सुविधा देते व एकूण वर्षाचे सर्व प्रकारचे चार्जेस लावते मग सुविधा देताना का बारकाई करते असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडतो आहे. तसेच शेतकऱ्यांनी कर्जासाठी दिलेले दस्तावेज बनवायला हजारो रुपये लागतात ते गहाळ होणे व कोणत्याही प्रकारचे काम न होण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे स्टेट बँक शाखा ढाणकी हे आता ग्राहकांच्या अंगवळणी पडले. केवायसी करण्यासाठी एकच ग्राहक चार वेळा जातो तरी त्याचे केवायसी चे काम होत नाही असे अनेक ग्राहक एकाच कामासाठी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते त्यामुळे ही यंत्रणा करते तरी काय?
