शेतमालाचे पडलेले भाव, सततची नापिकी, वाढलेल्या कर्जामुळे शेतकरी हतबल
(शेतीसाठी जगाच्या पोशिंद्यावर आली पशुधन विकण्याची वेळ)

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

       

सतत होणारी नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, अंगावर कर्जाचा बोझा यामुळे देशोधडीला लागलेला शेतकरी पुरता नैराश्यग्रस्त होऊन हतबल झाला असून आता तोंडावर खरिप हंगाम आलेला असून आपली काळी माती शेती सजवायला या जगाच्या पोशिंद्याने आपल्या लाडक्या ढवळ्या -पवळ्याच्या जोडीला विकायला काढले आहे.
शेतकऱ्याला त्याच्या शेतात राब राब राबणाऱ्या या ढवळ्या पवळ्या या बैल जोडीचा स्वतःच्या जीवापेक्षा जास्त लळा असतो. हे ईमानदार पशुदेखील आपल्या मालकावर तेव्हढेच किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम करतात. मात्र, अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना हे पशुधन जोपासणेदेखील
जड झाले आहे. सततची नापिकी, अस्मानी, सुलतानी संकट आणि कृषिप्रधान म्हणविल्या जाणाऱ्या या देशात शेतमालाचे सतत पडणारे भाव शेतकऱ्याला देशोधडीला लावित आहेत. शासनस्तरावरील उपाययोजनांची अंमलबजावणी फक्त: कागदावरच राहते. शेतकऱ्यासाठीच्या अनेक चांगल्या योजना दफ्तर दिरंगाईमुळे शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दाराशिवाय पर्याय उरत नाही. अशात सावकारी कर्जाचा डोंगर, संसाराचा गाडा हाकताना होत असलेली दमछाक, पडलेले कापसाचे दर या चौफेर संकटातून मुक्त होणार नसल्याची जाणीव असूनही, आज ना उद्या आपला दिवस उजाडेल या पोकळ असे वर शेतकरी जगत आहे.
उद्याचा दिवस आपलाच असेल या असेने शेतकरी खरिपाच्या नियोजनाला लागला आहे. मशागत करून शेतशिवार नीट केलेला शेतकरी आता बी-बियाणे यासाठी पर्याय शोधू लागला आहे. बँकांचे उंबरठे झिजवूनही अनेकांना कर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे. सावकाराच्या कर्जाचे साधे व्याजही देणे शक्य न झालेल्या शेतकऱ्याने खरिपासाठी आता गोठ्यातील बैल, गाय, म्हशी, बकरी इत्यादी पाळी व जनावरे विकण्याचा निर्णय घेतला.. आहे. ज्यांनी आपली इतके वर्ष सेवा केली, त्या पाळीव जनावरांना बाजारात विकण्यासाठी नेताना शेतकन्याची मनाची तगमग लपत नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीला हरविल्याचे दुखः आणि आपण स्वतः हा अपराध करीत असल्याने अपराधिपणाची भावना त्याच्या
डोळ्यात तरळत आहे. मागील पाच वर्षांपासून शेतकन्यांसोबत निसर्गाचा खेळ खंडोबा सुरू आहे. निसर्गाची वक्रदृष्टी अस्मानी संकटे, अवकाळीचा तडाखा यामुळे गेल्या काही वर्षात निसर्ग बदलला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होताना दिसते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकरी चहुबाजूंनी आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे विदारक वास्तव सगळीकडे आहे.
शेतकऱ्यांची मदार ही पूर्णतः नगदी पिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी व सोयाबीन वर असताना यावर्षी अतिवृष्टीत उत्पादनांवर विपरित परिणाम झाला. कापसाचे उत्पन्न कमी व बाजारात आवक कमी असल्याने निश्चितच कापसाचे दर १० ते १२ हजारांवर असेल ही भाबडी आशा होती, मात्र अशात कापसाचे आयात धोरण शेतकन्यांच्या जीवावर उठले. खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेती मशागतीच्या कामाला वेग आला असला तरी आजही अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरी साठवून आहे. कापसाचे दर निश्चितच वाहतील ह्या वेड्या आशेवर डोळ्यात पाणी आणून शेतकरी हतबल होऊन कापसाकडे बघत अश्रूला बाट मोकळी करून देत आहे. या पिकामधून सावकारी कर्जासह संसाराचा रथ कसा हाकायचा. घरी असलेल्या जनावरांची वैरणाचा प्रश्न कसा निकाली काढायचा. शेतकरी एकवेळ उपाशी राहू शकेल; परंतु ज्या जनावरांच्या मानेवर जू देऊन शेती मशागत केल्या जाते. त्यांना वैरणीची व्यवस्था खिशात पैसा नसल्यामुळे कशी करणार, हा यक्षप्रश्न शेतकन्यांसमोर आ वासून उभा आहे
थोडे फार का होईना कर्जाचे ओझे कमी होईल म्हणून ज्या बैलांनी आजपर्यंत शेतीसाठी सेवा दिली, उत्पन्न काढण्यास हातभार लावला, ज्या गाई म्हशीचे दूध आपल्या परिवाराला मिळाले त्यांनाच आज बाजारात विक्रीसाठी नेत असताना, डोळ्यात पाणी येऊन, अपराधिपणाची भावना घेऊन, अश्रूचा बांध अनावर होताना पाहावयास मिळत आहे.