अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले भाजपा पदाधिकारी

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा:चंद्रपूर जिल्ह्याचे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दिनांक २४/०७/२०२४ ला पोंभूर्णा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावानं मध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही गावातील घरामध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे त्यांना कुठे शाळेत तर कुठे सामाजिक सभागृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याची पाहणी करून त्यांना धान्याची किट देण्यात आली . व पूर परिस्थीती पाहणी केल्यानंतर घरांची पडझडं आणि शेतीचे नुकसान याची लवकरात लवकर पंचनामे करून शासनाला पाठवावे अशा प्रकारे तहसीलदार पोंभुर्णा यांचेशी चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदधिकारी कु. अल्काताई अत्राम महामंत्री महिला मोर्चा,विनोद भाऊ देशमुख माजी उप सभापती,ईश्वर भाऊ नैताम महामंत्री,हरिभाऊ ढवस महामंत्री,तूळशिराम भाऊ रोहनकर निराधार योजना अध्यक्ष,सचिन पोतराजे सरपंच, शुभांगी कुत्तारमारे सरपंच,रोशन भाऊ ठेगणे उपसरपंच,प्रेमदास इष्टाम सदस्य, कुळमेथे भाऊ सदस्य, कडते ताई सदस्य, लक्ष्मण शेडमके, बापूजी शेडमके,राजूभाऊ ठाकरे, अजित जांबुलवार इत्यादी कायकर्ते उपस्थित होते.