
हिमायतनगर प्रतिनिधी: (परमेश्वर सुर्यवंशी)
पोटा (बु) साठी विकास निधी कमी पडू देणार नाही
सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी माजी आमदार नागेश पाटील यांचे प्रतिपादन जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र एक करेल नागेश पाटील आष्टीकर यांचे वक्तव्य
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील पंचवीस पंधरा अंतर्गत बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन आज दी 25 जुलै रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार यांच्या वर विश्वास ठेऊन येथील भा.ज.पा.शाखाप्रमुख यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला व परिसरामध्ये कोरोणा काळात ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्या डॉक्टरांचा नागेश पाटील आष्टीकर व शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.संजय पवार, माजी नगरसेवक संजू भाऊ रोकडे, अवधूत देवसरकर यांनी उपस्थित कोरोना योध्याना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करतांना माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी असे सांगितले की सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार आहे त्या सरकार मध्ये आपले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत त्यामुळे मी आपल्या पोटा (बु) येथील सिंचनाचा प्रश्न त्यांच्या दरबारी मांडून तो सोडविण्यासाठी प्रयत्न करेल व लवकरच येणाऱ्या काळात मी पोटा बु.साठी विकास निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलताना माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले
यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे तालुका संघटक संजय काईतवाड, युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड, शिवसैनिक विठ्ठल ठाकरे ,राम नरवाडे,श्रीराम माने पाटील, वाघि ग्रामपंचायत सदस्य हमद ,कपिल हराळे व या कार्यक्रमाचे व्यवस्थापक संतोष पुलेवाड, सह आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते
