सैनिक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा पातळीवर सुयश, विभागस्तरीय खो – खो निवड चाचणी साठी तीन विद्यार्थीनी पात्र


सहसंपादक : रामभाऊ भोयर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ व तालुका क्रीडा समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२४ – २५ चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये यावर्षी सैनिक पब्लिक स्कूल वडकी चे वर्चस्व कायम राहिले होते त्याच प्रमाणे
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अंतर्गत दिग्रस येथे आयोजित १९ वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय खो- खो क्रिडा स्पर्धेत सैनिक पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वडकीच्या संघाने रजत पदक प्राप्त करीत द्वितीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. या संघातील रक्षा गेडाम, सृष्टी परचाके आणि रिंकू कवाणे या तीन विद्यार्थिनींची विभागस्तरीय शालेय खो -खो क्रिडा स्पर्धेसाठी होनाऱ्या निवड चाचणी साठी पात्र ठरलेल्या आहे.
क्रिडा विभाग प्रमुख प्रा.जितेंद्र यादव व क्रीडा शिक्षक राकेश सिंह दूहान यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली संघ प्रमुख रक्षा गेडाम, सृष्टी परचाके, रीया मेश्राम, भाग्यश्री नैताम, रिंकू कवाने, निशा परचाके, विद्या आत्राम, अंजली गेडाम, अनुराधा आत्राम, निवेदिता किंनाके व आरती गेडाम या विद्यार्थ्यानी सुयश प्राप्त केले आहे.. या संघातील सर्व विद्यार्थिनींचे संस्था अध्यक्ष श्री रणधीर सिंह दूहान, सचिव श्री सत्यवान सिंह दूहान, प्राचार्य श्री सचिन ठमके सहित सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व तालुका क्रीडा संयोजक प्रफुल खडसे यांनी सुध्धा संघाचे कौतुक केले.