
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशन येथे नव्याने नेर वरून आपले कर्तव्य सामाजिक जोपासून राळेगाव तालुक्यात रुजू झालेले जाधव साहेब यांनी नेर येथे असताना तालुक्यातील गरीब मुलांना राळेगाव येथील पेस सेंटरला पाठवून योग्य रित्या मार्गदर्शन करून होतकरू युवकांचे जीवन उज्वल करण्याचे ध्यास मनी बाळगल्याने नेर तालुक्यातील ऋत्विक पवार याची निवड पोलिस डिपार्टमेंट नेर कडून प्रथम ट्रेनींग सेंटर राळेगावला हॉस्पिट्यालिटी मध्ये हाऊसकिपींग या कोर्स मध्ये झाली व दोन महिन्याचा कोर्स पूर्ण करून त्यांना म्यॅरिएट हॉटेल, गोवा मध्ये नौकरी मिळाली दरमहा १४,०००/- पगार तसेच राहणे खाने मोफत मिळाले. तिथे नौकरी करित असताना ६ महिने पूर्ण झाले याचं सोबत आता बाहेर देशामध्ये नौकारी करिता तयारी करित असून पासपोर्टच्या कामाला गावी आलो आणि म्हणून आज कोर्स चे प्रमाणपत्र घेण्याकरिता राळेगाव इन्स्टिट्यूटला गेलो असता तेथील सेंटर इन्चार्ज आशिष इंगळे सरानी माझे सर्टिफिकेट रामकृष्ण जाधव साहेब पोलीस निरिक्षक, राळेगाव यांच्या हस्ते दिले ते जेव्हा नेर पोलीस स्टेशन ला होते तर त्यांच्या मुळेच या सेंटर ला ट्रेनिंग घेता आले म्हणून आज खूप खुश आहे. सर्व श्रेय पोलीस डिपार्टमेंट तसेंच प्रथम सेंटर व कोटक ला देतो. असे भावूक उदगार त्या मुलांनी काढले त्यामुळे गरीब मुलांप्रती असलेली जाणीव राळेगाव येथील ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या करिता वरदानच ठरणार की काय अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.व येथील ठाणेदार यानी केलेल्या कार्याची पावती.
