
तिरोड़ा (जिल्हा गोंदिया) : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्याल तिरोडा येथील ऑटोमोबाइल विषयामुळे विध्यार्थ्याना भविष्यामधे रोजगार उपलब्ध होऊ शकतात व याची पुर्वतयारी म्हणून 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांची भारत ऑटोमोबाइल चूरडी (तिरोड़ा) येथे 80 तासाची इंटर्नशिप ऑटोमोबाइल शिक्षक उमेंद्र रहांगडाले यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आली होती.
राज्यातील शासकीय माध्यमिक शाळांमधील अतिदुर्बल, आदिवासी व गरीब मुलांना व्यवसायाभिमुख बनवून आत्मनिर्भर बनवण्यासाठी सन २०१५-१६ पासून राज्यातील ६४६ पेक्षा जास्त माध्यमिक शाळांमध्ये ९ वी ते १२ वी वर्गासाठी समग्र शिक्षा मुंबई व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवले जाते, या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनवण्यायोग्य प्रशिक्षण दिले जाते. व याची पुर्वतयारी म्हणून 12 वी ऑटोमोबाइल शाखेच्या विद्यार्थ्यांनी भारत ऑटोमोबाइल चूरडी येथे इंटर्नशिप पूर्ण केली.
यात वर्ग 12 वी आदित्य जगनाडे, हिमांशू टेंभेकर, पियुष बिसेन, नाशिक ठाकरे, यश लोहबरे, राहुल सोनवणे, पुनीत पारधी, आयुष जांभुळकर, मयूर बाबरे, जतिन बिसेन, निखिल मेश्राम, निखिल पटले, हर्ष बरिकर, विजय भवरिया, महेंद्र परतती, रोहिणी नेवारे, तृप्ती जांभुळकर, प्राची आसटकर, अश्विनी लाडे, पायल नागपुरे, निकिता धाकदे, काजल कुकडे, निकिता लीलहारे, शालिनी अटराहे, हीना साखरे, रेशम बावने, भाग्यश्री चौधरी, निकिता पटले, वैष्णवी कांबळकर, हे उपस्थित होते.

इंटर्नशिप चा खरा अनुभव काय फायदे देतो-
🎯 इंटर्नशिपचे प्रात्यक्षिक कार्य विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवून स्वावलंबी बनविण्यासाठी मदत करते.
🎯 कामाचा प्रत्यक्ष अनुभव हा व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आत्मविश्वास निर्माण करते.
🎯 पुस्तकी ज्ञानाचा व्यवहारात वापर करण्यासाठी आवश्यक ती बौद्धिक लवचिकता निर्माण होते.
🎯 काम करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या उपाययोजना यांची प्रत्यक्ष ओळख होते.
🎯 कामाच्या ठिकाणचे काम करताना आवश्यक ठरणारी वर्तणूक कौशल्ये, संवाद कौशल्ये याबाबत जाण येते.
इंटरशिप दरम्यान भारत ऑटोमोबाइल वर्कशॉप चे सर्विस मेनेजर श्री. दिनेश शेंडे सर यांनी विध्यार्थ्याना ग्राहक सेवा संबंध, फोर व्हीलर सर्विसिंग, इंजन फिटिंग, इंजिन ECU वर्किंग, BS6 इंजन टेक्नोलॉजी, वाहन रोड सेफ्टी, मार्केटिंग, वाहनाची वाशिंग, Eco friendly वाहनांची माहिती व नवीन तकनीक, तसेच इत्यादि माहिती प्रात्यक्षिक द्वारे विध्यार्थ्याना करुण दिले. प्रात्यक्षिक विध्यर्थ्यानी स्वतः केल्यामुळे त्यांना ऑटोमोबाइल विषयाचा अधिक ज्ञान प्राप्त झाला.
इंटर्नशिप शाळेतील प्राचार्य मा. श्री. जी. एच. रहांगडाले सर, ऑटोमोबाइल शिक्षक उमेंद्र रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाली तसेच प्राचार्य व प्राध्यापक डी. एन. उपराडे यांनी प्रत्यक्ष इंटर्नशिप दरम्यान भेट देऊन संबंधित विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
