निंगणुर येथील तळ्यावर येतात परदेशी पाहुणे, पक्षी प्रेमीसाठी मेजवानी, मापक माशांच्या उपलब्धतेमुळे शिकारी पक्षांना मेजवानी


प्रतिनिधी, प्रवीण जोशी.
ढाणकी.


गेल्या काही दिवसापूर्वी थंडी गायब झाली होती पण नुकतच थंडीचे प्रमाण वाढले. आणि इतर विविध देशातील अनेक आकाशात उंच भरारी घेणारे रंगाने पाढरे शुभ्र बगळे आपल्या भागात पण दिसत आहेत. तसेच शेतीही आधुनिक पद्धतीने करत असल्याने शेतकऱ्यांची वाफे फोडून पाणी देण्याची पद्धत बंद झाली. व तुषार सिंचन पद्धत सुरू झाली वाफे पद्धतीने पाणी देत असताना पांढऱ्या शुभ्र डोलदार आणि उंच मान असलेल्या अनेक बगळ्यांच्या प्रजाती या निमित्ताने बघावयास मिळत होत्या पण आता या पक्षाने आसरा घेतला तरी कुठे…?
या पक्षाने आसरा कुठे घेतला असेल तर ढाणकी पासून जवळ असलेल्या नींग नूर येथील तळ्यावर. तळ्यातील पाण्यामुळे अनेक मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालतो. निसर्गाने अगदी मुक्त कंठाने या ठिकाणी उधळण केल्यामुळे व यावर्षी पाणी भरपूर पडल्यामुळे पाणी साठा सुद्धा मुबलक असल्याने येथील मनमोहक वातावरणाचा लाभ प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षापासून अनेक प्रकारचे देशी-विदेशी पक्षी तळ्याच्या परिसरात येत असतात. व त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तळ्याचा परिसर हा पक्षाचे आश्रयस्थान सुद्धा बनत आहे. यावर्षी परतीचा पाऊस अतिवृष्टीच्या स्वरूपात ब रसल्याने निंगनुर चे तळे अगदी ओसंडून वाहत होते. तसेच स्थळ बदलणारा पक्षी सखल भाग पाण्याने व्यापल्यामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमी अचूक व वेळेवर स्थलांतरित करत असतो. पण यावेळी हा पक्षी उशिराने आपल्या भागात डेरे दाखल झाला आहे. तळ्यात असणाऱ्या दलदलीत भागात लांब चिमट्यासारखी चोच खूप सून जलकृमींना भक्ष बनविणारे टिळवा _ स्ट्रीट, तूलवारसेंड पाईपर, पानटीवळागॉडफिट इत्यादी सुंदर पक्षाने हजेरी या ठिकाणी लावली आहे. तसेच उपलब्ध जलसाठ्यातील उघड्या असलेल्या जमिनीवरील हिरवळ असलेल्या ठिकाणी विविध असे ससानाफाल्कन, भोवत्याहॅरिअर विविध ठिपक्यांचा गरुड स्पॉटेड ईगल मधुबाज_हनी बझर्ड अशी जल कृमीची अलगद शिकारी पक्षांची थवे या ठिकाणी बघायला मिळत आहेत.
अनेक देखण्या पक्षांच्या आगमनाची प्रतीक्षा…….
नीगनूर येथील तळ्याच्या परिसरात रोहित अर्थातच फ्लेमिंगो व ढोलदार पक्षी येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूचे व प्रवास करणाऱ्याचे आकर्षण बनत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध असलेल्या पाणलोट क्षेत्रात हजारोच्या समूहाने येऊन पुढील अनेक दिवस मुक्काम करतात. यावर्षी या बाबी ऋतुचक्रामुळे उशिरा सुरू झाल्यामुळे या पक्षांनी आपले क्रमन लांबणीवर टाकले असून आज पावेतो पक्ष प्रेमींना त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता आला नाही हे विशेष.
निंग्नुर येथील तळ्याच्या तीरावरती सध्या पक्षाचे प्रमाण हळू हळू वाढत असून मासाहार करणारी बदके व इतर पक्षांचा मुक्काम मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. पण येणाऱ्या काळात तळ्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे जलाशयाच्या तीरावर दलदल व चिखली युक्त विभाग तयार होईल आणि याच काळात तळ्याच्या सभोवताली असणारे पान ओठे नष्ट होतील आणि जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान निंगनूर येथील तळ्याच्या परिसरात अनेक पक्षाच्या गर्दीने भाग फुलून जाईल
पर्यावरण, पक्षीप्रेमी…विजय वाडेकर.
छायाचित्रकार..प्रवीण धनवर.