महानुभाव पंथाचे दीक्षांत व्यासमुनी वैकुंठवासी शामराव महाराज यांनी ९९ व्या वर्षी घेतला आयुष्माचा अंतिम श्वास…..!!

                               राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

                              - **

महानुभाव पंथाचे दीक्षांत व्यासमुनी वैकुंठवासी शामराव महाराज यांच्या आयुष्यात ९९ वर्षे पूर्ण झाली होती त्यांनी निःसंकोचपणे सर्व त्याग केला होता आणि हसत खेळत दिनांक ११ फरवरी २०२४ ला दुपारी १:०० वाजता आयुष्याचा अंतिम श्वास घेतला.त्यांना भाव पुष्पांजली अर्पण करण्यासाठी मा मधुसूदन कोवे गुरुजी उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांनी पुढाकार घेऊन गवळी समाजातील नातेवाईक मित्र परिवार जेष्ठ मान्यवर मा अरुण भाऊ जोग अध्यक्ष जय विदर्भ पार्टी आणि विजय निवल, शेतकरी संघटना यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.वैकुंठवासी व्यासमुनी शामराव महाराज हे भोंगाडे कुटुंबातील होते त्यांचे चिरंजीव मा.कृष्णाजी भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ आणि अधिक तिन भाऊ व दोन बहिणी, अनेक नातु आणि सगे सोयरे यांच्या दुःखात बहुतांश विदर्भ राज्य आंदोलन समिती चे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे नेते पदाधिकारी समाजातील प्रतिष्ठित नागरिक विविध संघटना चे सभासद गवळी समाजातील नातेवाईक यांच्या सर्वांच्या बहुसंख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायत वैकुंठवासी व्यासमुनी शामराव महाराज यांच्या अंतिम संस्कार करुन मोक्षधाम यवतमाळ येथे भाव पुष्पांजली वाहून सर्वांनी अंतिम संस्कार करण्यात आले होते