मेट येथे संत सेवालाल महाराज यांची 284 जयंती उत्साहात साजरी


प्रतिनिधी प्रवीण जोशी
ढाणकी


ढाणकी पासून जवळच असलेल्या मेट या छोट्याशा गावामध्ये जगद्गुरु जगत ज्योती संत सेवालाल महाराज यांची जयंती अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात व तितक्याच शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली यावेळी सुरेश नाईक मित्र मंडळ मेट तर्फे व सर्व उपस्थित मान्यवरा तर्फे व भाविकांतर्फे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रति आदरव्यक्त केला व त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याचा गुण गौरवाचा आढावा घेण्यात आला. संपूर्ण विश्वाला माणूस म्हणून सेवालाल महाराज यांनी जीवन जगविणे शिकविले व आयुष्यभर ते चंदनासारखे झीजले म्हणूनच आज सुद्धा त्यांच्या विचारधारेने समाज चालतो व त्यांचेच विचार स्वीकारतो तत्कालीन काळात समाज अंधश्रद्धेच्या व विविध सामाजिक अडचणींना सामोरे जात होता परकीय आक्रमणांनी जनता हैराण असताना सेवालाल महाराजांनी प्रसंगी शस्त्र उचलून जनतेला सुरक्षितता बहाल केली शिवाय जीवन जगण्याचा नवीन मार्ग दाखविला अंधश्रद्धा बुवाबाजी व कर्मकांड अशा सर्वच बाजूंनी समाजाला वेढलेले असताना अशावेळी समाजाला मार्ग आणि दिशा दाखवणे गरजेचे होते एका अष्टपैलू जननायकाची गरज होती आणि तो नायक म्हणजे संतश्रेष्ठ सेवालाल महाराज अन्यायाविरुद्ध बंड करण्याची वृत्ती थोडीसुद्धा जनमानसात नसल्यामुळे महिलांवर गोरगरीब जनतेवर परकीय सत्तांनी प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घातला होता पण याला विरोध करून अन्याय सहन करणे चुकीचे असून आपल्यावरील होत असलेल्या अन्याय विरुद्ध बंड करण्याची शक्ती आणि रणसिंग त्यांनीच फुंकले म्हणून आज रोजी सुद्धा त्यांना लोकनायक व जननायक म्हणून संबोधले जाते हे विशेष. यावेळी सेवालाल महाराजांची आराध्य दैवत असलेल्या माता रेणुका मेट गावातील भगवती देवी जवळ विविध धार्मिक कार्यक्रमाची व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते महिलांनी आपला पारंपारिक वेशभूषेत सेवालाल महाराज यांची भजने व गीते गाऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला या कार्यक्रमाच्या वेळी बाहेरगावी असलेला नोकरदार वर्ग सुद्धा तेवढ्याच आपुलकीने हजर होत आहे विशेष.