
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांचा दिनांक 12/2/2025 रोज बुधवारला वाढदिवस असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राळेगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या व काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रूग्णालय राळेगाव येथे सकाळी ठीक अकरा वाजता उपस्थित रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. सोबतच तेथील रूग्णांना एक सहकार्य म्हणून फुल ना फुलाची पाकळी समजून ( नेब्युलायझर ) वाफारा मशीन दोन नग खरेदी विक्री संघाच्या वतीने उपस्थित डॉ. तिवारी मॅडम यांना सुपुर्द करण्यात आले. त्यावेळी प्रफुल्ल मानकर हे दिल्लीला असल्याने त्यांना फोन करून व व्हिडिओ काॅल करून शुभेच्छा देण्यात आल्या.त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेष्ठ संचालक दिपक देशमुख खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, वसंत जिनिंगचे अध्यक्ष नंदकुमार गांधी, खरेदी विक्री संघाचे उपसभापती मारोतराव पाल, नगरपंचायतचे नगराध्यक्ष रविंद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर,राजू महाजन खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर,कवडूजी कांबळे विनोद जयपूरकार भानुदास राऊत सर कोपरकर साहेब नंदू जयसिंगकार श्रीधर थुटुरकर सर नगरसेवक मंगेश राऊत मंगेश पिंपरे मोहन नरडवार,जितू कहुरके पंकज गावंडे अफसर अली, अंकित कटारिया तातोबा बोभाटे लियाकत अली राहूल बहाळे डॉ उगेमुगे, किशोर कांडुरवार, बाळासाहेब दरणे अरविंद झाडे व्यवस्थापक संजय जुमडे, गणेश हिवरकर, सचिन बोरकर, रोशन शिवरकर यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
