फुलसावंगी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विवेक पांढरे

महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

फुलसावंगी पत्रकार
संघाच्या अध्यक्षपदी लोकमतचे प्रतिनिधी विवेक मधुकरराव पांढरे यांची सर्वानुमते निवड करण्यातआली.

पत्रकार दिनी दरवर्षी फुलसावंगी पत्रकार संघाची कार्यकारिणी पुनर्गठित केली जाते. मागील वर्षी शैलेश वानखेडे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. यंदा विवेक पांढरे यांच्याकडे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली, विवेक पांढरे यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.