
[प्रवीण जोशी. प्रती, ढाणकी
शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढून श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येते. शहरातून जाणारा हा मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो अत्यंत खराब असल्याकारणाने, शहरातील सर्व गणेश मंडळांनी नगरपंचायत कडे तो मार्ग मुरूम टाकून व त्यावर रोलर फिरवून नीटनेटका करावा, जेणेकरून या मार्गाने श्रीगणेशाच्या मूर्तीची मिरवणूक सुरू असताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, रस्त्यावर खड्डे व दगडाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने मूर्तीला तडा जाऊ नये, या खबरदारी पोटी रीतसर निवेदन सुद्धा दिले होते. पण अवघ्या दोन दिवसांवर अनंत चतुर्दशी येऊन ठेपली. येत्या ९ तारखेला शहरातील श्री गणेशाची भव्य मिरवणूक निघणार असून, खड्डेयुक्त रस्त्यांची मिरवणूक मार्गावरील परिस्थिती अजूनही जैसे थे चं आहे. रीतसर अर्ज देऊन सुद्धा नगरपंचायतने अजूनही मिरवणूक मार्गावर मुरूम टाकून त्यावर रोलर फिरवले नसल्याचे सर्व श्री गणेश मंडळांचे म्हणणे आहे. दोन दिवस शिल्लक असून, अजूनही या रस्त्यांवर मुरूम कधी पडणार? मुरूम पडल्यानंतर त्यावर रोलर कधी फिरणार? जेणेकरून श्री गणेश विसर्जन मिरवणूक सुस्थितीत पार पडेल असा सवाल गणेश मंडळातर्फे केल्या जात आहे. ही नगरपंचायत बद्दलची खदखद ढाणकी शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांकडून बोलून दाखवल्या जात आहे.
