
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव खंड २ शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की त्यांच्या शेतात लावलेले कपाशीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार तसेच रोपट्यांची वाढ खुंटल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्यामुळे शेत शिवारातील पाहणी करण्याकरिता तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी कृषी पर्यवेक्षक राजू ताकसांडे कृषी सहाय्यक अनिता ताकसांडे यांनी राळेगाव खंड २ येथील शेतकरी रामा सोळंके यांच्या शेतीत भेट देऊन कपाशीच्या रोपट्यांचे परीक्षण केले रोपट्यांचे वाढ खुंटले असल्याची माहिती त्यांनी लोकमत प्रतिनिधींना दिली बियाण्याची लागवड चार जून रोजी केली असून आज एक महिना लोटूनही कपाशीचे रोपटे चार इंची च्या वर वाढ झाली नाही पर्यायाने या शेतात किमान 20 टक्के अशा रोपट्यांची संख्या असल्यामुळे संबंधित बियाण्याची लागवड केल्यानंतर सर्व प्रकारचे बिल घेऊन कार्यालयात येण्याची चिन्ह येण्याची सूचना शेतकऱ्याला देण्यात आली आहे महिला लोटल्यानंतर किमान नऊ इंच ते दहा इंच रोपट्यांची वाढ व्हायला पाहिजे ती वाढ का खुंटली याचे शास्त्रज्ञ कडून माहिती घेतला जाईल अशी माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी दिली.
