
संत लटारे महाराज देवस्थान कारंजा (घा) येथे १९ ऑगस्ट २०२३ ला ७६ वा स्वातंत्र्य दिन निमित्त भारतीय सैन्यात निवड झालेल्या सैनिकांचा व वुशू स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलिस्ट खेळाडू यांचा तसेच मुंबई पोलीस मध्ये निवड तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे महाराष्ट्र मंत्रालय येथे क्लर्क म्हणून निवड झालेल्यांचा सहपरिवार सत्कार सोहळा दिनांक १९/०८/२०२३ शनिवार रोजी पार पडला. यावेळी कारंजा तहसिलचे तहसीलदार ऐश्वर्या गिरी, कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे, मॉडेल हायस्कूल कारंजा चे मुख्यध्यापक श्री. टोपले, शिक्षक श्री. कायंदे, श्री. कांबळे, श्री. चाफले उपस्थित होते.यावेळी भारतीय सैन्यात निवड झालेल्या हर्षल मांडोकार, बादल वाटकर, सागर सरोदे, रितेश बेलखेडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे क्लर्क म्हणून मंत्रालय, मुंबई येथे निवड झालेल्या आशिष देवासे, मुंबई पोलीस मध्ये निवड झालेल्या जावेद पठाण, वुशू स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलिस्ट शिवानी देवासे यांचा सहपरिवार सत्कार समारंभ पार पडला.या वेळी ठाणेदार श्री. गाढे म्हणाले कोणत्याही श्रेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम व इच्छाशक्ती असावी लागते, स्वतः ला ओळखल्यास आपण जग जिंकू शकतो. तहसीलदार गिरी मॅडम म्हणाल्या चांगला माणूस देशाच्या उन्नती साठी प्रयत्न करा, पराभवाने खचून न जाता जिद्दीने पुन्हा प्रयत्न करा, आवडत्या क्षेत्रात करिअर केल्यास यश निश्चित मिळते. यावेळी शिक्षकांनीही मार्गदर्शन केले. सहपरिवार सत्कारामुळे पालकही भावुक झालेले बघावयास मिळाले.
सत्कार समारंभासाठी विश्वभुषन पाटील, आशू हिंगमिरे, रतन भुसारी, जय हिंगवे, लखन डोंगरे, केतन खवशी, योगेश डोंगरे,अंकित खांडवे, समिर बैंगणे, पवन फरकाडे, हर्षल बमनोटे, अक्षय बोडखे, करण गाडगे, राजू पांढूरकर, विशाल चोपडे, कुणाल बोडखे, गौरव फरकाडे, सारंग धारपुरे, बादल घागरे, स्वप्निल ढोबाळे, रोहीत घागरे, दिपाली बारंगे, सोनू चोपडे, देवव्यानी चोपडे, प्रतिक्षा गाखरे, प्रांजली धांदे, आदींनी सहकार्य केले.
