लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याने बँकेत तोबा गर्दी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्र शासनाने सध्या लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केली असून यामधील बहुतांशी महिलांना गेल्या काही दिवसापासून पैसे जमा झाले असून ज्या कोणाला आपले 3000 जमा झाले नाही त्यांची गेल्या दोन दिवसापासून बँकेत तोबा गर्दी बघताना दिसून येत आहे, गर्दीचे कारण बँकेत असलेला कर्मचाऱ्यांचा स्टॉप हा कमी असल्याने जनतेस व लाडके बहिणीस हा त्रास सहन करावा लागत आहे तसेच लाडकी बहिणीचे पैसे हे 19 ऑगस्टला जमा होणार होते परंतु आजतागायत जमा न झाल्याने बँकेचे आधार कार्ड लिंक असून सुद्धा कोणालाही काही कारणास्तव पैसे जमा न झाल्याने त्यांना विनाकारण बँकेचा हेलपाटा घ्यावा लागत आहे अपेक्षा फक्त माझी लाडकी बहिणीचे पैसे माझ्या खात्यात जमा व्हावे खाते सुरू असताना सुद्धा आधार कार्ड लिंक नसल्याने असा बँकेकडून व्यवहार सांगण्यात येत आहे अकदी बरोबर तिथे चौकशी केली असता आधार कार्ड हे आज रोजी लिंक आहे असे दाखवत असताना सुद्धा काही लाडक्या बहिणींना खात्यात पैसे जमा झाले नाही त्यामुळे सध्या लाडक्या बहिणीचा गोंधळ उडताना दिसून येत आहे.लाडक्या बहिनींना पैसे मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. लाडकी बहीण योजनेचा फाॅर्म भरताना अनेकांनी आपले पोस्ट किंवा इतर राष्ट्रीयकृत बँकेचे खाते जोडले. मात्र त्या जोडलेल्या खात्यांमध्येच पैसे येण्याऐवजी इतर कुठल्यातरी खात्यात पैसे गेल्याचे अनेक महिलांना आढळून आले आहे. विशेष म्हणजे हे पैसे त्या महिलांचे जे खाते डीबीटी-मॅपींग (डायरेक्ट मनी ट्रान्सफर) झालेले असेल अश्या लिंक असलेल्या खात्यामध्ये आपोआप गेले. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बचत गट उचलताना जे खाते काढले होते, अश्या लिंक असलेल्या खात्यांमध्येही अनेकांचे पैसे गेले आहेत. तर काहींचे बचत गटाचे पैसे थकीत असल्याने जमा झालेले पैसे त्या थकीत खात्यात वळते झाल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलांना पैसे जमा होवुनही काढता आले नाही. त्यामुळे अनेक महिलाना रक्षाबंधनाचे भावाने पाठविलेली ओवळणी मिळण्यात अडचण झाली आहे.