
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दैनिक महासागर प्रेस क्लब मुंबई व्दारा आयोजित महासागर एक्सीलेन्स अवार्ड चे आयोजन दि. 18 मे 2025 रोजी वसंत बळवंत फडके नाटयसभागृह मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळयात दैनिक महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, अभिनेत्री दिपाली सैय्यद व मुंबई विभागातील आमदार, खासदार व मंत्रीगण प्रामुख्याने उपस्थित होते.
विविधक्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तींचा या सोहळयात सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ येथील राष्ट्रशक्ती फिल्म मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कलावंत संघटेनेचे सक्रिय कार्यकर्ते रवि भोंगाडे यांना अभिनेत्री दिपाली सैय्यद यांनी कलारत्न एक्सीलेन्स अवार्ड देऊनसन्मानीत केले. त्यांच्या या सन्माना बद्यल संपुर्ण राज्यातुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कलेच्या क्षेत्रात रवि भोंगाडे 30 ते 40 वर्षापासुन कलावंत संघटने करीता सक्रीय कार्य करीत आहे. त्यांच्या उल्लेखनिय कार्याचा हा महान असा सन्मान झाल्याचे राष्ट्रशक्ती फिल्म मुंबईच्या राष्ट्रीय सचिव स्वाती रोंघे यांनी मनोगत व्यक्त केले. सहयोगी राधीका लाडु व अनेक मुंबईतील पत्रकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. हम है भारतवासी टिम, ओ बाबा चित्रपट अभिनय कार्यशाळा ग्रुप, राज्यस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव ग्रुप तसेच राष्ट्रशक्ती फिल्म, मुंबई शाखा यवतमाळ चे जिल्हाध्यक्षा अंजुबेन जैन, सचिव उज्वला जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश डब्बावार, रमेशबाबु वाघमारे, प्रशांत उजवणे, संध्याताई काळे, भारतीताई सावते, पुष्पलता सप्रे, शरद सप्रे, प्राची नगराळे यांनीही शुभेच्छा दिल्या. “लाखोंकी बस्ती मे दिलदार हस्ती” अशा शब्दात पत्रकार व कोरीओग्राफर हाफीज खान वाशिम यांचे शुभेच्छा पत्र प्राप्त झाले. तसेच दादासाहेब फाळके चित्रपट युनियन, मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित म्हामुनकर सर यांनीही शुभेच्छा दिल्या, डॉ. अंजलीताई गवार्ले यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
