दुचाकीला रानडुकराची धडक एक ठार एक जखमी

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा वरून आपले कामकाज आटोपून दिनांक ५/०६/२०२३ सोमवारला रात्री ९ च्या सुमारास गोविंदा कुमरे वय ४५ वर्ष व कालीदास पेंदोर वय ४२ वर्ष हे दुचाकीने बोर्डा दिक्षीत येथे आपल्या स्वगावी जात असतांना दुचाकीस्वाराला पोंभूर्णा मार्गावरील कसरगठ्ठा गावाजवळ रानडुकराची धडक बसल्याने दुचाकीचा अपघात झाला हि धडक इतकी जोरदार होती कि यात कालीदास पेंदोर यांचा घटणास्थळीच मृत्यू झाला तर गोविंदा कुमरे हे जखमी झाले आहेत जखमीला ग्रामीण रुग्नालय पोंभूर्णा येथे उपचारार्थ दाखल केले असून मृतक कालीदास पेंदोर यांचा शवविच्छेदन करून अंतीम संस्कार करण्यात आले कालीदास पेंदोर हे घरचे कर्ते पुरुष होते त्यांच्या अशा अचानक निघून जान्यानी कुटूंबावर दुखःचा डोंगर कोसळला असून दोन वर्षापूर्वी त्यांच्या मुलाचेहि निधन झाले होते घटणेचा पूढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत