
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि,२५/१२/२०२३ रोजी सकाळी ६.२५ वाजता दरम्यान मौजा वालधुर रोड वर तलाठी शिवानी सातोकर तलाठी तिरनकर उपविभागीय अधिकारी वाहन चालक सुरज पारदी यांनी अवैध रेती वाहतुक करणारा एक ट्रैक्टर जप्त केला तसेच आज दि-२५/१२/२०२३ रोजी ९ वाजता दरम्यान मौजा वाढोना बाजार रोड वर तलाठी शिवानी सातोकर तलाठी तिरनकर उपविभागीय अधिकारी वाहन चालक सुरज पारडी यांनी अवैध वाहतुक करताना ट्रैक्टर जप्त केले. सदर दोन्ही ट्रैक्टर पंचनामा करून पुढील दंडात्मक कार्यवाही करीता सदर वाहन तहसील कार्यालय राळेगाव येथे जमा करण्यात आले आहे.
