
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात सध्या लहान मुलांना पळून नेणारी टोळी आली आहे अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात मागील आठ दिवसापासून सोशल मीडियावर मुलांना पळून नेणारी टोळी सक्रिय असून लहान मुलांना पळवून नेत असल्याचे मेसेज फिरत असून यामध्ये पुरुष व महिला असून हे लहान मुलांचे अपहरण करत असल्याचे संदेश फिरत आहे या टोळ्यापासून मुलांना धोका असल्याचे सांगत असून लहान मुलांना सांभाळण्यात यावे असे सांगितले जात असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊ लागली आहे मात्र प्रत्यक्षात मुलांना पळून नेणारी अशी कुठलीही टोळी सक्रिय असल्याचे समोर आलेले नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता खात्री करावी आवश्यक तेथे नजीकच्या पोलिसाची मदत घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय चौबे यांच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान या अफवेने पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून सोशल मीडियावर कुठलीही माहिती किंवा व्हिडिओ शेअर फॉरवर्ड करताना आपण अफवा तर पसरवीत नाही ना याची काळजी घ्यावी अन्यथा चुकीचा मेसेज किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर्स केल्यास गुन्हा नोंदविण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
लहान मुलांना पळून नेणारी टोळी आल्याची अफवा तथ्यहीन आहे,अशी कोणतीही टोळी आलेली नाही. कृपया या अफवेमुळे घाबरु जावू नका,सोशल मिङीयावर येणा-या बातमीची खातरजमा करा. काही माहीतीची खातरजमा करणे असल्यास कृपया पोलीस स्टेशनशी
संपर्क साधावा
पोलीस निरीक्षक राळेगाव
संजय चौबे
