
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिव्यांग व्यक्ती च्या समस्या ऐकून घेण्यासाठी ग्राम स्वराज्य महामंच च्या संकल्पनेतून राळेगाव येथे ” चला दिव्यांगाशी बोलु या….!!” या कार्यक्रमाचे आयोजन. आशाताई काळे दिन दुबळ्या च्या आई यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते दिव्यांग व्यक्ती च्या समस्या ऐकून घेताना कार्यक्रमात सर्वांचे डोळे पाणावले होते पण दिव्यांग व्यक्ती ला खूप आनंद झाला होता की ग्राम स्वराज्य महामंच च्या परिवारातील लोकांनी आमच्या सोबत चर्चा केली आणि आम्हाला बोलु दिलं आशाताईंनी आमच्या दिव्यांच्या मनात वाढदिवस साजरा करुन आमचं हलकं हलकं केले ही प्रेरणा ग्राम स्वराज्य महामंच च्या संकल्पनेतून मिळाली आहे म्हणून मा मधुसूदनजी कोवे गुरुजी यांच कौतुक सर्व दिव्यांग व्यक्ती ने केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती आशाताई काळे-यवतमाळ ह्या होत्या आणि प्रमुख उपस्थिती मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा.पपिता माळवे आम्ही साऱ्या सावित्री श्रीमती करुणा वानखेडे- राळेगाव ग्राम स्वराज्य महामंच मा.मेघशाम चांदे ( मामा ) मनिष काळे गुरुजी श्रीमती सुनीता तोमर आणि भुपेंद्रजी कारीया यांची प्रमुख उपस्थिती होती. चला दिव्यांग व्यक्तीशी बोलुया….!!
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे होते दिव्यांग व्यक्ती चा सन्मान म्हणून पुरुषाला एक शर्ट पिस आणि महिलांना एक साठी भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युसूफ अली सय्यद यांनी केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवाव्रती मा.वाल्मिकजी मेश्राम गुरुजी अशोकराव भागवत नितीन ठाकरे श्रीधर ढवस दिलीप राव भुडे ग्राम पंचायत सदस्य श्रीरामपूर संजय जी हामंद आष्टा शितल ताई लोणी आणि ग्राम स्वराज्य महामंच च्या परिवारातील लोकांनी सहकार्य केले
