
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
परीसरात रोज रात्रीला अवैध रेतीच्या टीप्परची सर्रासपणे ओव्हरलोड वाहतुक सुरु. रोज रात्रीला अवैध रेती तस्कर आपल्या दहा बारा लोकांना सोबत घेऊन रोडवर पाइंट, पाइंट वर ऊभे राहुन येणाऱ्या अधिकार्यांची माहीत आपल्या नदीवर जाऊन असलेल्यांना सहकार्यांना दिली जाते. त्यामुळे शासनाचा करोडचा महसुल बुडत आहे. अवैध रेतीची ओव्हरलोड वाहतुक करण्याला नेमके कोणाचे पाठबळ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात व राळेगाव तालुक्यात जात असल्यामुळे प्रशासनाचा लाखोचा महसूल बुडत आहे या रेती तस्करा कडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे, कि प्रशासनाचे या रेती तस्करांकडून हात ओले झाले असावे असे जनसामान्यात प्रश्न निर्माण होत आहे.
