
वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे गजानन नगर येथील रहिवासी परमानंद तिराणीक यांच्या घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत कुलूप तोडून चोरट्यानी आत शिरले.घरातील दोन मोबाइल व आलमारीत ठेवलेली रोकड लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास उघडकीस आली.
परमानंद तिराणीक यांची मोठी मुलगी घरी आल्यानंतर तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले .आतून दरवाजा लावून होता .घरात जाऊन बघितल्यावर अलमारीतील सर्व कपडे ,सामान अत्याव्यस्त दिसले.त्यानंतर वडिलांना फोन करून घरी चोरी झाल्याचे सांगितले.तात्काळ वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
