‘नेताजी विद्यालय राळेगाव’ येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव-दि 15/10/2023 रोज रविवार ला डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा’ दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी थोर नेत्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाचन केले,विद्यालयाचे मुख्याध्यापक ओंकार सर आणि जेष्ठ शिक्षक वासेकर सर यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्व पटवून दिले तसेच भारतरत्न डॉ कलाम यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा वाचनाची सवय लावावी,असे सांगितले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक कुबडे सर यांनी केले या कार्यक्रमाला सहाय्यक शिक्षिका कु केवटे, कु चावट,कु सोनोने कु नागरे तसेच शिपाई सचिन पांडे उपस्थित होते