पीक कर्जावरती सहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

आजतागायत शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळायचे त्या पीक कर्जावर आता 6% व्याज द्यावे लागनार आहे शासनाने घेतलेल्या या निर्णयाने नक्कीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार एवढे निश्चित।।। शेतकऱ्यांना पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळत आहेत पण नुकताच शासनाने घेतलेल्या निर्णयाने पीक कर्जासाठी आता शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज द्यावे लागेल शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराच्या पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर मुद्दल व सहा टक्के दराने व्याजाचा भरणा करण्यासंदर्भात नुकताच राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहेत ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहेत ।।।शून्य टक्के व्याजदर पीक कर्ज योजनेत संदर्भात पात्र शेतकऱ्यांना यापूर्वी पीक कर्जाचा भरणा करताना व्याज देणे अनिवार्य नव्हते केवळ मुदल भरून शेतकरी जुन्या कर्जातून निल व्हायचे व नवीन कर्ज घ्यायचे मात्र राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता पीक कर्जाच्या मुद्दलासमवेत सहा टक्के दराने व्याज भरावे लागणार आहेत सव्याज कर्ज फेडले तरच शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल असा हट्ट राज्य सरकारने धरला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्राविका ह्या कर्जवाटप करतात 31 मार्च पर्यंत ग्राविका मध्ये कर्ज भरल्यास शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज भरावे लागते व्याज नंतर राज्य व केंद्र सरकार भरते नवा नियम अमलात आल्यास शेतकऱ्यांना पीक कर्ज सहा टकके व्याजाने भरावे लागेल निश्चितच हा शेतकऱ्यांना भुर्दंड आहेत सद्यस्थितीत सततची नैसर्गिक संकटे शेतीमालाच्या घसरत्या किमती यामुळे मूद्दल भरणेही अनेक वेळा शेतकऱ्यांना अशक्य होते पुष्कळ वेळा शेतकरी काहीतरी तडजोड करून 31 मार्चपर्यंत कसेबसे आपले मुद्दल भरतो आता ते सहा टक्के व्याजाने भरावे लागले तर निश्चितच शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहील यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात थकीत राहील ज्याचा परिणाम शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार नाही बँकांचे सुद्धा कर्ज थकतील त्यामुळेच राज्य शासनाने पीक कर्जावरती सहा टक्के व्याजदरचा घेतलेला निर्णय हा जुलमी असून तो रद्द करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे या मागणीसाठी राळेगाव ग्राविकाच्या वतीने अलीकडच्या काळामध्ये आंदोलन करण्यात येणार आहेत.